Pune Crime | अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात ! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पार्क केलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेऊन चोरलेला टेम्पो जप्त (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी राजा अरुणकुमार मरीण्यन (रा. महंमदवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजा मरीण्यन यांनी त्यांचा मालकीचा अशोक लेलँड (Ashok Leyland) कंपनीचा टेम्पो (एमएच 12 एसएक्स 2035) 18 डिसेंबर रोजी उरुळी देवाची येथे उभा केला होता. टेम्पो घेण्यासाठी गेले असता त्यांना टेम्पो दिसला नसल्याने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बुधवारी (दि.5) घटनास्थळाजवळ असलेले सीसीटीव्ही तपासून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. (Pune Crime)

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) , पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Minor vehicle thief detained in 24 hours 4 lakh confiscated ; Loni Kalbhor police action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी