Pune Crime | मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या वडिलांचा अल्पवयीन मुलांच्या हल्ल्यात मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलीला शेळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या एका पालकावर अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने हल्ला (Minor Youth Attack) केल्याची धक्कादयक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) येथे घडली आहे. ही घटना शाळेच्या परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेले शशिकांत कारंडे Shashikant Karande (वय-54 रा. त्रिमुर्ती नगर, बारामती) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. घटनेनंतर आरोपी पळुन (Pune Crime) गेले आहे.

 

शशिकांत कारंडे हे आपल्या मुलीला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जाण्यासाठी शाळा (School) परिसरात आले होते. त्यावेळी 3 ते 4 अल्पवयीन मुलांनी धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर आणि पाठीवर वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Baramati Police) घटनास्थळी धाव घेत कारंडे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. (Pune Crime)

 

कारंडे यांची मुलगी शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये (Kavivarya Moropant High School) इयत्ता नववीत शिकते.
शाळा सुटल्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यासाठी कारंडे हे शाळेत आले होते.
त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना 5.15 ते 5.30 दरम्यान घडली.
या घटनेमुळे शाळेतील मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांनी कारंडे यांच्या मुलावर दोन महिन्यापूर्वी वार केले होते.
त्यावेळी हा वाद मिटवण्यात आला होता. यानंतर याच मुलांनी कारंडे यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून (Murder) केला.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Crime | minor youth attack on man who went to pick up his daughter from school in baramati of pune disrict

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dahi Handi-2022 | दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, गोविंदांना असा होईल फायदा

 

Maharashtra Monsoon Season | अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री ‘क्लीन बोल्ड’, सरकारची नामुष्की

 

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा