×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठीच्या मोबाईलवर खंडणीची मागणी करून...

Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठीच्या मोबाईलवर खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन ५ लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threats To Kill) देण्यात आली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ Deepak Dhondiba Misal (वय ५६,रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात Bibvewadi Police Station (गु. रजि. नं. १७९/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख Imran Sameer Sheikh (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अ‍ॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | MLA Madhuri Misal was threatened with death and demanded extortion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News