Pune Crime | बारामती : लग्नाची वरात थांबवल्याच्या रागातून जमावाकडून पोलीस पथकावर हल्ला; पोलीस हवालदार जखमी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | डॉल्बीच्या कर्कश आवाजात लग्नाची एक दिवस आधी रात्रीच्या वेळी काढलेल्या वरातीमुळे वाहतुकीला (traffic) अडथळा निर्माण झाला होता. याची दखल घेत ती वरात थांबवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला  (Police squad) जमावाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील लिमटेक येथे घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि.19) रात्री घडला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी (Police personnel injured) झाला आहे.

 

बारामती शहर पोलीस ठाण्यातील (Baramati City Police Station) पोलीस हवालदार विलास विठ्ठल मोरे (Vilas Vitthal More) हे जखमी झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉल्बी चालक, ऑपरेटर यांच्यासह 23 जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे यासह शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे, अजय सोनवणे, रोहित शिंदे, महेश खिलारे यांच्यासह भिगवण येथील श्रीनाथ ओम डिजिटलचे मालक व ऑपरेटर आणि इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विलास मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलीस कर्मचारी विलास मोरे आपली ड्यूटी बजावत होते. त्यावेळी वरिष्ठांनी त्यांना लिमटेक येथे डॉल्बी लावून वरता (wedding party) सुरु असून वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले. त्यानुसार मोरे हे त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी वरात थांबवण्याची सूचना दिली. जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याचे सांगून डॉल्बी वाजवण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

पोलिसांनी सांगून देखील डॉल्बी बंद केला जात नसल्याने, ते गाडीतून उतरताच 10 ते 12 जणांचा जमाव त्यांच्या अंगावर आला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत आमचा डीजे बंद करतो काय, याला आपण खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी दमदाटी करुन मारहाण (Beating) केली. यामध्ये मोरे जखमी झाले आहेत. तसेच आरोपींनी सरकारी वाहनावर दगडफेक केली.

 

मोरे यांचे सहकारी काळे व शेंडगे यांनी सरकारी वाहन बाजूला केले.
त्यानंतर 8 ते 10 महिलांचा जमाव मोरे यांच्या अंगावर धावून आला.
त्यांनी देखील मोरे यांना धमकावत मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जखमी मोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | mob beat police Havaldar of baramati for stopping a wedding party pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा