Pune Crime | उत्तमनगर परिसरात टोळक्याकडून कोयते नाचवत वाहनांवर दगडफेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड (Vehicle vandalism) होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील (Pune Crime) उत्तमनगर परिसरात घडली आहे. वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करत असताना झालेल्या किरकोळ वादातून (Disputes) टोळक्याने कोयते नाचवत परिसरातील दुचाकी आणि मोटारींची तोडफोड केली. तसेच नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजवली. हा प्रकार कोंढवे धावडे परिसरातील शिवशक्ती चौकात घडला.

 

या प्रकरणी सचिन दिलीप राठोड Sachin Dilip Rathore (वय 24, रा. कोंढवे धावडे) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर Shubham Sandeep Thakur (वय 18), सोन्या खाडे (Sonya Khade), अक्षय राठोड (Akshay Rathore) तसेच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहिम गणेश मौर्य Rohim Ganesh Maurya (वय 20, रा. मोरे बिल्डींग, कोपरे गाव) याने या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम ठाकूर याचा कोंढवे धावडे येथे वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी आरोपींची रोहिम मौर्य याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून टोळक्याने त्यांच्या हातातील कोयते नाचवून परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली. आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | mob threw stones at vehicles while dancing in birthday celebration uttam nagar incident of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा