Pune Crime | मोबाईलने तोडले दात; पतीविरुद्ध दाखल केला मारहाणीचा गुन्हा, वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीपत्नीच्या भांडणात अनेकाना रागाच्या भरात हाताला जे येईल ते फेकून मारण्याचा काही जणांचा स्वभाव असतो. पण, त्यामुळे पुढे काय होईल, याचा अनेक जण विचार करत नाही. सध्या सर्वांच्या जवळ असणारी वस्तू म्हणजे मोबाईल. एका पतीने हातातील मोबाईल फेकून मारला. तो नेमका पत्नीच्या तोंडावर बसला अन काय तिचे चक्क पुढील आणि कडेचे दात पडले. वारजे येथील रामनगरमध्ये ही घटना घडली.

 

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या पत्नीने वारजे पोलिसांकडे (Warje Malwadi Police) फिर्याद (गु. रजि. नं. ३२५/२२) दिली आहे. पोलिसांनी तिच्या ३८ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime). हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन भांडणे झाली. फिर्यादी यांच्या चरित्र्याचा संशय (Suspicion of character) घेऊन पतीने शिवीगाळ करुन मोबाईल फिर्यादीच्या तोंडावर फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे पुढील व साईडचे दात पडून त्यांच्या तोंडाला जखम झाली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title : –  Pune Crime | mobile phone broke teeth Case of assault filed against husband incident in Warje Malwadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा