Pune Crime | पुण्यात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड; मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thief) टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एक (Pune Crime Branch Unit 1) च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी शहरातील विविध ठिकाणाहून चोरलेले 76 हजार रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी जप्त (Pune Crime) केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.8) केली.

 

मुकेश शिवलाल दिवाकर (वय-21 रा. यशवंत नगर, जुने साईबाबा मंदीरमागे, खराडी, मुळ रा. उत्तर प्रदेश), दिपककुमार मोहन जयस्वाल (वय-23 रा. चंदन नगर चौपाटी, पुणे, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत तृप्ती संजय छाजेड Trupti Sanjay Chhajed (वय-22 रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली होती. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शहरातील घरफोडी (Burglary in pune), चोरी, दरोडा (Robbery in pune) गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजय थोरात (Ajay Thorat) यांना पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील दोघेजण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी यशवंत नगर (Yashwant Nagar), खराडी (Kharadi), चंदननगर येथील बाजार पेठेत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना सापळा रचून अटक केली. आरोपींनी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील रिलायबल ट्रेडिंग कंपनीतून (Reliable Trading Company) मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Mobile theft gang nabbed by pune police crime branch in crowded places in Pune; Mobile confiscated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | कोरोनाची तिसरी लाट सुरू, पिकवर कधी असेल? राजेश टोपे म्हणाले…

 

Post Office Yojana | फक्त 100 रूपयानं गुंतवूणक सुरू करून 5 वर्षात मिळवा 20 लाख रुपये, जाणून घ्या कसे

 

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण