Pune Crime | चक्क मोबाईल टॉवर गेला चोरीला ! मॉडेल कॉलनी, पाषाणमधील मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँकसह साहित्य चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू अथवा घरात शिरुन चोरटे चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. पण, मोबाईल टॉवर (Mobile Tower), डिझेल जनरेटर बॅटरी बँक (Diesel Generator Battery Bank) व इतर साहित्य असा २७ लाखांहून अधिक किंमतीचा माल राजरोजपणे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी देवेंद्र कुंभलकर (वय ४१, रा. वडगाव शेरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र कुंभलकर हे जीटीएल कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. कंपनीने पाषाण (Pashan, Pune) येथील सं. नं. १२१ हाऊस आणि प्लॉट नं. २ येथे मोबाईल टॉवर उभारले होते. त्या जागेवर कोणीतरी अतिक्रमण करुन तेथील संपूर्ण मोबाईल टॉवर, डिझेल जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे असा २० लाख १९ हजार ७५९ रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार एप्रिल २०२१ मध्ये घडला होता.

त्याचप्रमाणे मॉडेल कॉलनीतील (Model Colony Pune) कुसाळकर निवास येथे मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे असा ६ लाख २८ हजार ९१० रुपयांचे साहित्य कोणीतरी चोरुन नेले.
हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडला होता हे मोबाईल टॉवर कसे चोरीला गेले कोणी चोरले.
हे मोबाईल टॉवर कधीपासून बंद पडले, याविषयी काहीही माहिती कंपनीकडून पोलिसांना देण्यात आलेली नाही.
कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा (FIR Registered By Court Order) दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | mobile tower was stolen Material including model colony mobile tower in pashan generator battery bank

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा