Pune Crime | पुण्यातील आणखी एका टोळीवर मोक्काची कारवाई, येरवडा परिसरात दहशत पसरविण्याचा केला होता प्रयत्न

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. पुणे शहरातील (Pune Crime) येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 13 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे, अशितोष सुभाष अडागळे, शिवराज मनोज मिरगळ,
तेजस हरीदास दनाने, विवेक उर्फ शुभम दुर्गेश सिंग, कुणाला उर्फ सोनबा संजय चांदने,
संदीप सुग्रीव घोडेस्वार, रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे, दिपक दत्तु मदने, करण भारत सोनवणे,
महेश सुनिल कांबळे, अजय युवराज कसबे, अनिकेत अनंत कसबे पाहिजे असलेला आरोपी महेश सरवदे असे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे व त्याच्या साथिदारांनी आरोपींनी येरवडा पोलीस स्टेशनच्या (Yerawada Police Station) हद्दीत 1 जुलै रोजी रात्री तीघांवर जीवघेणा हल्ला केला.
याच दरम्यान टोळीतील सदस्याने एकाला दगड मारुन हातातील मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला.
तसेच परिसरात दहशत करण्याच्या उद्देशाने हातात तलवार, कोयते, पालघन व सिमेंट ब्लॉक घेऊन साक्षीदारांच्या घरावर मारुन, घरातील सामान फेकून दिले.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली.

 

आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior inspector Yunus Shaikh)
यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan) यांना पाठवला होता.
त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव (Assistant Commissioner of Police Kishor Jadhav) हे करीत आहेत.

आतापर्यंत 47 टोळ्यांवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 47 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title : Pune Crime | Mocca operation against another gang in Pune, an attempt to spread terror in Yerawada area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | भुमिगत इंटरनेटर केबलवर महापालिका ‘मिळकत कर’ आकारणार; उत्पन्न वाढीसाठी ‘भिलाई’ पॅटर्न राबविणार

Modi Government | 65 लाख पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा ! 45 दिवसात प्रकरणे निकाली काढणार, कार्यालयांच्या माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

Sputnik Light | खुशखबर ! पुढील महिन्यात येतेय ‘सिंगल डोस स्पूतनिक लाईट’ व्हॅक्सीन, जाणून घ्या किती असेल किंमत