Pune Crime | ढेकण्या वाघमारे टोळीविरूद्ध ‘मोक्का’चा बडगा; ‘मोक्का’ कारवाईच्या शतकापासून (100) पुणे पोलिस एक पाउल दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्कास्त्र उगारत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. दहशत, खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), अपहरण (Kidnapping) करणाऱ्या टोळींचा सुफडासाफ झाल्यामुळे गुन्हेगारीचा आलेखही कमी झाला आहे. (Pune Crime)

 

संघटित गुन्हेगारी करून चतुःशृंगी ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा सराईत रोहित ऊर्फ प्रेम ऊर्फ ढेकण्या राहुल वाघमारे Rohit alias Prem alias Dhekanya Rahul Waghmare (वय १९ रा. औंध टोळी प्रमुख) याच्यासह सात साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. रोहित ऊर्फ प्रेम ऊर्फ ढेकण्या राहुल वाघमारे (वय १९ ) शुभम अशोक गायकवाड Shubham Ashok Gaikwad (वय २५) अनिकेत राजु पवार Aniket Raju Pawar (वय १९) नयन संजय लोंढे Nayan Sanjay Londhe (वय १९) अदित्य सचिन वाघमारे Aditya Sachin Waghmare (वय १९) अमित नारायण साबळे (Amit Narayan Sable) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यामध्ये दोन अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. (Pune Crime)

 

टोळीविरूद्ध मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghachavare) यांनी उपायुक्त रोहिदास पवार (Deputy Commissioner Rohidas Pawar) यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner Namdev Chavan) आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला.

 

प्रस्तावाची पडताळणी करून टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (Assistant Commissioner of Police Aarti Bansode) करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त नामदेव चव्हाण , उपायुक्त रोहिदास पवार,
एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman),
एपीआय राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक निलेश महाडिक अमित छडीदार, अमित गद्रे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Mocca’s Bardga against the Dhekany Waghmare tribe; Pune Police one step away from Mokka century

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind vs SA | गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेचा ‘तो’ रेकॉर्ड मोडण्याचे टीम इंडियासमोर आहे लक्ष्य

Indonesia Football Match Stampede | फुटबॉल मॅच हरल्यानंतर मैदानात झालेल्या चेंगराचेंगरीत 127 जणांचा मृत्यू

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप