Pune Crime | हडपसरमध्ये युवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | भटक्या कुत्र्यांना खायला घालणार्‍या महिलेला एकाने ‘तू त्याच्याकडून पिल्ले काढुन घे’ असे म्हणत अश्लिल बोलून विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसर (Hadapsar) परिसरात घडला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) एका युवकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भटक्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. यावेळी आरोपी तेथे आला. त्याने ‘तू या कुत्र्यांना खायला देऊ नको. मला माहिती आहेत तुझे नखरे, तू धंदा करते, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात. तू त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याचेकडून पिल्लु काढून घे’, असे अश्लिल बोलून त्याने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title : pune crime | molestation case against aniket shitole in hadapsar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

PMRDA | ‘सुस- म्हाळुंगे’ गावातील सार्वजनिक हिताच्या आरक्षणाबाबत विचार केला जाईल – नगरसेवक बाबुराव चांदेरे

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय