Pune Crime | पुण्यात 47 वर्षीय नराधम बापाकडूनच 17 व 14 वर्षाच्या मुलींसमोर अश्लील व घाणेरडं कृत्य; पेट्रोल टाकून मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरात पत्नी नसताना १४ व १७ वर्षाच्या मुलांसमोर अंगावरील संपूर्ण कपडे काढून बाप झोपत होता. मुली झोपल्या असताना त्यांच्या अंगावरील कपडे काढून (Molestation Case in Pune) त्यांना पैसे दाखवून आपल्याकडे येण्याचे इशारे देणार्‍या बापाला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) अटक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth, Pune) एका ४७ वर्षाच्या नराधम बापाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिची १४ वर्षाची बहिण, आई, वडिलांसह मंगळवार पेठेत राहतात. तिची आई घरात नसताना फिर्यादी व तिच्या लहान बहिणीला लाज वाटेल अशा पद्धतीने तिचा बाप अंगावरील संपूर्ण कपडे काढून घरात झोपतो. १८ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादीची बहिण घरात एकटी झोपली असताना तिच्या वडिलांने तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून तिला पैसे दाखवून आपल्याकडे येण्यासाठी हाताने इशारे केले. तसेच २७ जानेवारी २०२२ रोजी १७ वर्षाची फिर्यादी घरात एकट्या झोपल्या असताना तिच्या बापानेच तिच्या तोंडावर व छातीवरुन हात फिरवला. फिर्यादीने हा प्रकार आईला सांगितल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Molestation Case Mangalwar Peth Faraskhana Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा