Pune Crime | MPSC च्या क्लासला जाणार्‍या 26 वर्षीय विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग, हडपसर परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना तसेच एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीची निर्घुण हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. MPSC क्लासला जाणार्‍या महिलेची भर दिवसा रस्त्यावर अनेकदा छेडछाड (molestation case) होत असल्याचे आढळून (Pune Crime) आले आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात Hadapsar Police Station (८४५/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम संभाजी गरुड (वय २२, रा. ढमाळवाडी, हडपसर) आणि हर्षद मारुती कुंजीर (वय २२, रा. पापडे वस्ती, हडपसर) यांच्यावर विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाला असून त्या सध्या एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्या भेकराईनगर येथील एका अभ्यासिकेत जातात. तेथे जात असताना आरोपी हे त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्यांची आणखी हिंमत वाढून ते त्यांच्या जवळून जाऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करुन येण्या जाण्याच्या मार्गात उभे रहात. १३ सप्टेंबर रोजी भर दुपारी साडेचार वाजता या दोघा टोळ भैरवांनी त्यांचा रस्ता आडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल नंबर घेतला. तसेच त्यांना फोनवर बोलल्या नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी ही हकीकत घरी सांगितली. पती व दीराने धीर दिल्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी (व्हिडीओ)

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Udayanraje Bhosale |  उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’

Pizza मिळाला नाही म्हणून 18 वर्षाच्या मुलीनं दिला जीव, वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर निघाली अंत्ययात्रा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | molestation case of 26-year-old married woman who is going to MPSC class in Hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update