Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण

पुणे : Pume Crime | सिग्नल तोडून जाताना तेथे थांबलेल्या महिला पोलीस हवालदाराला धक्का दिला. त्याचा जाब विचारल्यावर त्यांना अश्लिल शिवीगाळ करणार्‍यास बंडगार्डन पोलिसांनी (Bund Gardan Police) अटक (Pune Crime) केली आहे.

मकसुद बाबु शेख (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षाच्या महिला पोलीस हवालदार यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोलेदिना रोडवरील महेश लंच होमजवळ (Mahesh Lunch Home, Pune) बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता घडला. या महिला हवालदार सिग्नल लाल असल्याचे थांबल्या होत्या. त्यावेळी मकसुद हा पाठीमागून मोटारसायकलवरुन आला. सिग्नल तोडून जाताना त्याने फिर्यादी यांना धक्का दिला. याचा जाब फिर्यादी यांनी विचारल्याने राग आल्याने त्याने त्याची गाडी बाजूला घेतली. तू मला विचारणारी कोण असे म्हणून त्यांच्यासोबत वाद घातला. अश्लिल शिवीगाळ (Pune Crime) करुन हावभाव करुन फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेला़ व तुला आता जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली. बंडगार्डन पोलिसांनी (Pune Bund Gardan Police) मकसुद शेख याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला 4 वर्षाची शिक्षा,10 हजारांचा दंड

Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | molestation lady police in pune, bund gardan police arrest maksud babu shaikh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update