Pune Crime | 15 वर्षीय मुलीच्या आईशी ‘झेंगाट’ असणार्‍यांनं केलं घृणास्पद कृत्य, ‘तिच्या’शी अश्लिल चाळे करणार्‍यावर FIR, हडपसरमधील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | आईशी प्रेमसंबंध असताना तिच्या अल्पवयीन मुलीबरोबरही अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी हडपसर (Hadapsar) येथे राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात Hadapsar Police Station (गु. र. नं. ८६६/२१) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार मे २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. हडपसर पोलिसांनी मुंबईत राहणार्‍या अजित रतन जैस्वाल Ajit Ratan Jaiswal (रा. मुंबई)
या आरोपीविरुद्ध ३५४, ३५४ अ, ५०६, पोक्सो ८ अंतर्गत गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या आईचा प्रियकर आहे.
या मुलीची आई बाहेर गेली असताना तो त्यांच्या घरी आला होता.
आई घरात नसल्याचा फायदा घेऊन त्याने या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्या शरिरावरुन हात फिरवत तिच्या मनास लज्जा वाटेल, असे वर्तन केले.
हा प्रकार आईला सांगितल्यास तुला व लहान बहिणीला मारुन टाकीन, अशी धमकी त्याने दिली होती.
त्यामुळे गेले वर्षभर ही मुलगी त्याचे अश्लिल चाळे सहन करत होती. शेवटी तिने हडपसर पोलिसांकडे तक्रार केली.
महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

Web Title : pune crime | molestation of 15 years old girl in hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Town Planning | राज्यातील अनधिकृत बांधकामांना कम्पाऊंडिंग चार्जेस आकारून ‘अभय’; नगरविकास विभागाने काढला आदेश

Hot Water Advantages | गरम पाण्यात मिसळून ‘या’ गोष्टींचे करा सेवन; पचन होईल व्यवस्थित, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा भाव