Pune Crime | दुकान मालकाकडून 30 वर्षीय महिलेचा विनयभंग ! दिले सिगारेटचे चटके, FIR दाखल

पुणे / राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाड्याने घेतलेले दुकान उघडायचे नाही या कराणावरुन दुकान जागा मालकाने एका विवाहितेचा विनयभंग (molestation case) केल्याची घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. एवढेच नाही तर दुकान जागा मालकाने महिलेला सिगारेटचे चटके (Cigarette butts) दिले. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) खेड तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) दोघांविरोधात तक्रार केली आहे.

 

महिलेच्या तक्रारीवरुन खेड पोलिसांनी जगदीश सुभाष आरुडे (Jagdish Subhash Arude), सुभाष नामदेव आरुडे Subhash Namdev Arude (रा. पाबळरोड, ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळरोड (Pabal Road) येथे जोशी वडेवाले (joshi wadewale) शेजारी प्रशांत सुभाष आरुडे यांचे मालकीचा गाळा फिर्यादी यांनी भाड्याने घेतला आहे. फिर्यादी व फिर्यादीचा पती दुकान उघडण्यासाठी गेले असता जगदीश त्या ठिकाणी आला. त्याने महिलेला दुकान उघडायचे नाही म्हणत पीडितेचा हात धरुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

 

एवढ्यावर न थांबता त्याने डावा हात पिरगळून शिवीगाळ करत दमदाटी करुन मारहाण (Beating) केली.
यावेळी सुभाष आरुडे त्या ठिकाणी आला.
त्याने पीडित महिलेला एका हाताने मारहाण (Pune Crime) करुन दुसऱ्या हातात
असलेली पेटत्या सिगारटेने डावे हातावर चटके देऊन पाठीत सिगारेट टाकली.
पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे (Police Constable Balkrishna Sable) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | molestation of 30 year old woman by shop owner, FIR filed in khed police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

UPSC ची तयारी करणार्‍या ‘आकांक्षा’ने केली गळफास घेऊन केली आत्महत्या

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

Waqf Board Land Scam Case | वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक; प्रचंड खळबळ