Pune Crime | PMPML प्रवासात कंडक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; स्वारगेट ते विश्रांतवाडी बस प्रवासातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पीएमपी बस (PMPML Bus) प्रवासात अल्पवयीन मुलीला (Minor Girl) खेटून उभे राहिल्याबद्दल तिकीट चेकरकडे (Ticket Checker) तक्रार केल्याने बस कंडक्टरने (PMPML Bus Conductor) या मुलीच्या कमरेला जाणीवपूर्वक तीन वेळा हात लावून विनयभंग (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) बस प्रवासात घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) बस कंडक्टरला अटक (Arrest) केली आहे.

 

प्रशांत किसन गोडगे Prashant Kisan Godge (वय ३०, रा. कात्रत कोंढवा रोड, कात्रज) असे अटक केलेल्या पीएमपी बस कंडक्टरचे नाव आहे.

 

याप्रकरणी विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथे राहणार्‍या १७ वर्षाच्या मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार स्वारगेट ते विश्रांतवाडी (Swargate to Vishrantwadi) या बस प्रवासात वेस्टएंड चित्रपटगृह ते विश्रांतवाडी (West End Cinema to Vishrantwadi) प्रवासादरम्यान शनिवारी सकाळी साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी या स्वारगेट ते विश्रांतवाडी या बसने प्रवास करीत असताना फिर्यादी या बसमध्ये उभ्या असताना बसचा कंडक्टर प्रशाांत गोडगे हा फिर्यादीला खेटून उभा राहिला.
त्यावर फिर्यादी यांनी त्यास तुला बाजूला उभा राहण्यास जागा नाही काय असे विचारले.
तिकीट चेकर गाडीमध्ये आले असताना त्यांच्याकडे फिर्यादी यांनी तक्रार केली.
त्याचा राग मनात धरुन प्रशांत गोडगे याने फिर्यादीकडे डोळे वटारुन पाहून त्यांच्या कमरेला मुद्दामहून तीन वेळा हात लावून त्यांचा विनयभंग केला, म्हणून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कंडक्टरला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे (Sub-Inspector of Police Waghmare) तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Molestation of a minor girl by a conductor in PMPML bus Incidents on the
bus journey from Swargate to Vishrantwadi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा