Pune Crime | ‘तुझ्यासाठी 5 वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’ ! विनयभंग करुन पिंपरीमधील मायलेकीचा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुझ्यासाठी पाच वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस असे म्हणून मायलेकीचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात घडली आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity) खोटा गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी (Threat) आरोपीने दिली. हा प्रकार चिंचवड येथे 2018 पासून 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

चरणदास महादेव खडसे Charandas Mahadev Khadse (वय-45 रा. दत्तनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलीकडे पाहून आरोपी हा अश्लील वर्तन (Pornography) करत होता. हा प्रकार वारंवार होत असल्याने फिर्यादी महिला व त्यांचे कुटुंबीय आरोपीकडे याबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. आरोपीने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धमकी दिली की, तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. (Pune Crime)

यानंतर फिर्यादी महिलेचा मुलाने तूमचं वय काय, तुम्ही असं का बोलता असे म्हणून आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने मुलाला शिवीगाळ करुन ढकलून दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी महिलेसोबत पुन्हा अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तुझ्यासाठी मी पाच वर्षे घालवले. तू माझी झाली पाहिजे, असे म्हणून आरोपीने पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे (PSI Dattatraya More) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Molestation of mother and daughter Pimpri Police arrested Charandas Mahadev Khadse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sara Sachin Tendulkar | …म्हणून सारा तेंडुलकर झाली भलतीच खुश; इंस्टाग्रामवर पोस्ट केला ‘हा’ फोटो, झाला क्षणात ‘व्हायरल’

 

Sugarcane Juice Benefits | चवीला उत्कृष्ट असण्यासह आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो उसाचा रस, जाणून घ्या असंख्य फायदे

 

Old And New Tax Slabs | कामाची बातमी ! जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅबची अशी करा निवड, नवीन व्यवस्थेत यांना मिळू शकतो फायदा