Pune Crime | पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीसोबत लज्जास्पद प्रकार, नराधमाने चक्क पार्श्वभागावर चापट मारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका 29 वर्षीय डॉक्टर तरुणीचा (Young Lady Doctor) विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या (B. J. Medical College Pune) प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला आहे. ही तरुणी प्रवेशद्वारातून जाताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करुन तिचा विनयभंग (Pune Crime) केला.

याबाबत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर असून रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या बीजे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून जात असतानाच आरोपी दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला. त्याने काही समजण्याच्या आत त्याने डॉक्टर तरुणीच्या पार्श्वभागावर चापट मारली आणि पळून गेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Molestation of young lady doctor at the gate of bj medical college in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त