Pune Crime | इंदापूरमध्ये दुचाकीस्वारानं रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या नादात 2 लाख गमावले

पुणे / इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पैशाची बॅग पळवून (money bag snatched) नेण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी रस्त्यावर टाकलेल्या दोन-चार नोटा उचलण्यासाठी दुचाकीवरुन खाली उतरला. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर शहरात (Indapur city) घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेत चोरट्यांनी 2 लाख 33 हजार रुपये चोरुन नेले.

याप्रकरणी विकास मानसिंग भोसले Vikas Mansingh Bhosale (वय-42 रा. डाळज नं.1) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास भोसले हे इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेतून 2 लाख 33 हजार रुपये घेऊन घरी जात होते. हिरो मोटार सायकल शोरुम जवळ रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या उद्देशाने दोन-चार नोटा टाकल्या. भोसलेंना आपल्याच पडल्या असल्याचे वाटल्याने त्यांनी दुचाकी थांबवून खाली उतरले.

भोसले नोटा उचलण्याच्या नादात असताना दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. या घटनेची नोंद इंदापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे (API Dnyaneshwar Dhanve) हे करीत आहेत.

हे देखील वाचा

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार म्हणाले…

Health News | दुसर्‍या लाटेनंतर लहान मुलं आणि प्रौढांमधील मणक्याच्या वेदनांमध्ये चार पटींनी वाढ; मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा इशारा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | money bag disappears indapur all day long lost rs 2 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update