Pune Crime | अजित पवार यांच्यानंतर PCMC आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने मागितले पैसे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा वापर करुन पैसे मागितल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांच्या छायाचित्राचा व्हॉट्सअप प्रोफाईल (WhatsApp Profile) म्हणून वापर करुन ऑनलाइन चॅटींगद्वारे (Online Chatting) नगरसेवक (Corporator) तसेच नागरिकांना फसविण्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण (Nilkanth Poman) यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) सायबर सेलकडे (Cyber Cell) फेक आयडी आणि फ्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार (FIR) नोंदवली आहे.

 

नीळकंठ पोमण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्र. 7524891151 या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसदस्य आणि अन्य नागरिक यांच्याशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. तसेच मोबाईल क्र. 7977510080 या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे. (Pune Crime)

पिंपरी-चिंचवड महापालिका पसिरात फसवणुकीचे प्रकार घडत आहे.
नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाइन चॅटींग केली जात आहे.
तसेच आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.
अज्ञात व्यक्तीने मोबाईल नंबरवरुन व्हॉट्सअपच्या माध्यमातून नगरसेवक व इतर नागरिक यांच्याशी आयुक्तांचा डीपी वापरुन, ऑनलाइन चॅटींग केली. आर्थिक मदतीची विचारणा केली. याबाबतचा प्रकार निदर्शनास आल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘फेक प्रोफाईल आयडी’द्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये.
महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांना कळविण्यात येते की आपल्याला कोणी फेक आयडीवरुन फसवणूक (Cheating) होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

Web Title :- Pune Crime | Money demanded in the name of PCMC Commissioner Rajesh Patil after Ajit Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा