×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार...

Pune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार नागराज उर्फ नागेश नायकोडी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा १५ टक्के व्याजाने १ लाखावर ६ लाख रुपये परत केले असतानाही अजून अडीच लाखांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्‍या सावकाराला पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

 

नागराज ऊर्फ नागेश रत्नाकर नायकोडी Nagraj alias Nagesh Ratnakar Naikodi (वय २४, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड) असे या अटक (Arrest) केलेल्या सावकराचे नाव आहे.

 

याबाबत आंबेगाव येथील एका ३५ वर्षाच्या नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६४/२२) दिली आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.
फिर्यादी यांनी नागराज याच्याकडून १५ टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते.
त्या बदल्यात फिर्यादीने आरोपीला ५ लाख ९५ हजार ५३० रुपये ऑनलाईन तसेच फोन पे (Phone Pay) द्वारे पाठविले.
असे असताना तो जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात शिरला. अजून अडीच लाख रुपयांची मागणी करु लागला.
पैसे नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
पोलिसांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर नागराज याला अटक केली असून
सहायक पोलीस निरीक्षक यादव (Assistant Police Inspector Yadav) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Moneylender Nagraj alias Nagesh Naikodi, who threatened to enter the house even after returning the money 5 times, arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CCL | सीसीएलकडून पुण्‍यामध्‍ये वनस्‍पती-आधारित मांस उत्‍पादनांची श्रेणी लॉन्‍च

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Gulabrao Patil | ‘सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट’, गुलाबराव पाटलांची जळजळीत टीका

Must Read
Related News