Pune Crime | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात; आईसह मुलीचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील (Shirur Taluka) (टाकळी हाजी 9Takli Haji) येथे झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) आईसह मुलीचा मृत्यू झाला. तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) सकाळी पावणे नऊच्या सुमारास फाकटे रोडवर (Fakte Road) झाला. जिजाबाई केरुभाऊ पळसकर Jijabai Kerubhau Palaskar (वय-52) आणि ताराबाई महादू साबळे Tarabai Mahadu Sable (वय-73) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. तर विलास महादु साबळे Vilas Mahadu Sable (वय-47) हे जखमी झाले (Pune Crime) आहेत. (Pune Accident News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, विलास साबळे आणि त्यांची आई ताराबाई साबळे हे टाकळी हाजी येथून दुचाकीवरुन साबळेवाडी येथे जात होते. दरम्यान फाकटे रोडवर त्यांना त्यांची बहिण जिजाबाई पळसकर रस्त्याने पायी जाताना दिसल्या. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ताराबाई आणि जिजाबाई या मायलेकी रस्त्याच्या कडेला बोलत थांबवल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकची धडक दोघींना आणि गाडीवर बसलेल्या विलास यांना बसली.(Pune Crime)

 

ट्रकचे चाक ताराबाई यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जिजाबाई या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने शिरुर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच जिजाबाई यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक (एमएच 17 ओजी 9259) ताब्यात घेतला आहे. टाकळी हाजी पोलीस चौकीमध्ये (Takli Haji Police Chowki) ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले (PSI Sunil Ugale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | mother and daughter died in an accident at taklihaji of shirur taluka of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या 4 नामांकित हॉटेल, हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई; वॉटर बार, द हाउज अफेअर रुफटाॅप व्हिलेज, ‘अजांत जॅक्स’ चा समावेश

Diabetes Control Health Tips | तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने मधुमेहावर मिळवाल नियंत्रण; जाणून घ्या

Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली घोषणा, आनंदाने नाचू लागले कर्मचारी