Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विवाहयोग्य वय नसतानाही खोटी जन्मतारीख सांगून मुलाबरोबर विवाह लावला. सासू व सासर्‍यांनी अश्लील व्हिडिओ (Pornographic Video) पाहण्यास लावून विवाहितेचा विनयभंग (Molestation Case) केला. घटस्फोट (Divorce) हवा असेल तर, 21 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून समाजाच्या व्हाट्सअप ग्रुप वर पत्र टाकून विवाहितेची बदनामी केल्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

याप्रकरणी हडपसर येथे राहणार्‍या एका 21 वर्षाच्या विवाहितेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीचे 87 वर्षाचे सासरे (Father-in-Law), सासू (Mother-in-Law) व पती (Husband) विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार तसेच बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार (Child Marriage Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 31 नोव्हेबर 2021 ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासू, सासरे यांनी त्यांचा मुलगा हा कायदेशीरदृष्ट्या विवाहाच्या वयाचा नसल्याचे माहिती असतानाही त्याची खोटी जन्मतारीख सांगून विश्वासात घेतले. फिर्यादी यांच्याबरोबर त्याचा विवाह लावून दिला. फिर्यादी या सासरी आल्यावर सासू व सासर्‍यांनी फिर्यादी त्यांना अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांचा मानसिक छळ केला. सोडचिठ्ठी हवी असल्यास 21 लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा समाजात बदनामी करीन अशी धमकी (Defamation Threat) दिली. त्यांच्या समाजाचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर फिर्यादी यांचे लग्नाचे फोटो धमकीचे राजपूत बोली भाषेतील परंतु, देवनागरी लिपीत लिहिलेले हस्तलिखित पत्र टाकून फिर्यादी यांची समाजात बदनामी केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लांभाते (PSI Lambhate) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

 

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

 

Pune News | GPA तर्फे ‘डाॅक्टर्स डे’ उत्साहात साजरा ! डाॅ.विजय पाटील यांना ‘जी पी डाॅक्टर ऑफ ईयर’ पुरस्कार प्रदान