Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महापालिकेत (Pune Corporation) शिरुन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर कोंढव्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी (Kondhwa Water Issue) आंदोलन करणार्‍या नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More), साईनाथ बाबर (Corporator Sainath Babar) यांच्यासह MNS च्या १०० ते १२५ जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अशोक बनकर (वय ५९, रा. हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
महापालिकेच्या (PMC) मुदतीचा सोमवार हा शेवटचा दिवस होता.
महापालिकेत सभा (PMC GB) असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर व मनसेचे १०० ते १२५ कार्यकर्ते जबरदस्तीने महापालिकेत शिरले.
त्यांनी तिसर्‍या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर एकत्र येऊन कोंढवा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन धरणे आंदोलन केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन गुरुवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Movement on water issue in Kondhwa A case has been registered against
MNS corporator Vasant More Corporator Sainath Babar and other activists

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा