Pune Crime | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 88 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार राकेश शंकर ठोकळ याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 88 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार राकेश शंकर ठोकळ (वय 21, रा. खजुरे वस्ती दर्ग्याच्या मागे, वैदवाडी, हडपसर, पुणे) याने साथीदाराच्या मदतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, तलवार यांसारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे असे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime)

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
राकेश ठोकळ याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती