Pune Crime | ‘आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर MPDA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (gaja marne) यांची तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई-पुणे द्रितगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) रॅली काढली होती. या रॅलीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. गजा मारणेच्या रॅलीची व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) गुंडावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

संतोष पांडुरंग तोंडे (वय-38, रा. सुतारदरा, कोथरुड, सध्या रा. खेचरे, ता. मुळशी) असे या गुंडाचे नाव आहे. संतोष तोंडे याने साथीदारांसह कोथरुड, हडपसर, तळेगाव दाभाडे, पोलीस ठाण्यात तसेच पुणे शहरात दुखापत, दरोडा तयारी, दंगा, खंडणी, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 15 वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा तळोजा तुरुंगातून बाहर आल्यानंतर त्याची वाहनांच्या ताफ्यासह मोठी रॅली काढली होती. या रॅलीमुळे मुंबई-पुणे महामार्ग पूर्ण पणे ब्लॉक झाला होता. या रॅलीमध्ये संतोष तोंडे याच्यासह 200-300 साथिदारांनी सहभाग घेतला होता. त्याने मुळशी पॅटर्न चित्रपटातील डायलॉगची क्लिप तयार करुन ‘आला रे आला, तुमचा बाप आला’ अशा मजकुराची घोषणा करत ही क्लिप व्हायरल करुन जनतेमध्ये दहशत निर्माण केली.

कोथरुड पोलीस ठाण्याचे (Kothrud Police Station)
तत्कालीन पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे (Police Inspectors Meghshyam Dange)
व महेंद्र जगताप (Mahendra Jagtap) यांनी एनपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.
पोलिस आयुक्तांनी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करुन संतोष तोंडे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या 10 महिन्यात 36 गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे.

Web Titel :- Pune Crime | MPDA takes action against those who viralized the video of ‘Aala Re Aala, Tumcha Baap Aala’ rally gaja marne

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Honeytrap Case | पुण्यातील भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून केली खंडणीची मागणी; तोतया पत्रकारासह टोळी गजाआड, सापडले CBI चे बनावट ओळखपत्र

Gold Price Today | 46 हजारच्या खाली गेले सोने, चांदीत 724 रुपयांची घसरण; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्यातील व्यावसायिकाकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी; पत्रकार शिरसाठ विरूध्द हडपसरमध्ये गुन्हा दाखल