Pune Crime | कोंढव्यात महावितरण कर्मचाऱ्याला कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी, महिलेसह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | वीज बील (Electricity bill) भरले नसल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईटचे मिटर काढून नेले. यामुळे चिडलेल्या तिघांनी महावितरण कार्यालयात येऊन कर्मचाऱ्याला (MSEDCL Employee) शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) एका महिलेसह तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

सचिन कौल Sachin Kaul (वय-40), एक अनोळखी व्यक्ती (वय-45), अनोळखी महिला (वय-27) यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश राजाराम पवार Suresh Rajaram Pawar (वय-39 रा. फुरसूंगी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार महावितरणच्या गंगा व्हिलेज सेक्शन उंड्री (Ganga Village Section Undri) येथील कार्यालयात सोमवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे वीज बिल वसुलीचे काम सोपवण्यात आले आहे.
आरोपी सचिन कौल याने त्याचे विजबील भरले नसल्याने फिर्यादी यांनी न्याती इंटरनिटी सोसायटी (Nyati Internet Society) येथील त्यांचे विजमीटर काढून नेले.
वीज तोडल्याने तिघे आरोपी महावितरणच्या गंगा व्हिलेज कार्यालयात गेले.
त्याठिकाणी फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकावले (Pune Crime).
तसेच आरोपींनी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जीवे मारु अशी धमकी देऊन पसार झाले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव (PSI S.S. Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | MSEDCL employee threatened to come to office in Kondhwa, FIR against three including woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | जबरदस्तीने धर्मांतरास ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’चा विरोध

Pune Court | अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात विश्रांतवाडी-धानोरी परिसरातील एका महिलेसह दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात