Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढव्यातील वीज पुरवठा रात्रीपासून खंडीत झाल्याने संतापलेल्या दोघांनी महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयात जाऊन तेथील कर्मचार्‍याला मारहाण केली. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

दत्तात्रय काळुराम धांडेकर (वय ३५) आणि प्रथमेश सोपान धांडेकर (वय २९, दोघेही रा. धांडेकरनगर, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल शंकर पाटील (वय ५६, रा. आंबेगाव) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा (Kondhwa) येथील महावितरणच्या (Mahavitaran) सोमजी शाखा येथे बुधवारी सकाळी १० वाजता घडला.

धांडेकरनगर येथील वीजपुरवठा आदल्या रात्रीपासून खंडीत झाला होता. त्यामुळे चिडलेले धांडेकर हे सोमजी शाखा येथील कार्यालयात आले. त्यांनी रात्रीपासून लाईट बंद  आहे, कधी सुरु होणार अशी चौकशी केली. त्या कारणावरुन शिवीगाळ करुन तेथील कर्मचारी कृष्णा गुट्टे यांना गालावर तसेच डोक्यावर हाताने चापटी मारल्या. फिर्यादी हे सोडविण्यासाठी मध्ये पडले असताना त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. कार्यालयामध्ये दोघांनी मिळून आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन तुम्हाला आता सर्वांना दाखवितो, असे बोलून धमकी दिली.दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल करुन पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | MSEDCL employees beaten due to power outage in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या