×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला...

Pune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला स्वारगेट पोलिसांकडून अटक

पुणे : Pune Crime | स्वयंपाक करण्याचे काम करताना विश्वास संपादन करुन घरातील २२ लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

मुकेश महाराज Mukesh Maharaj (रा. सुखसागर नगर, कात्रज) असे या महाराजाचे नाव आहे. याप्रकरणी सेलिसबरी पार्क (Salisbury Park) येथे राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०५/२२) दिली आहे. त्यांच्याकडे मुकेश महाराज ऊर्फ मुलाराम जान्दु (Mularam Jandu) हा २०२० पासून स्वयंपाक् बनविण्याचे काम करतो. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत तो त्यांच्या घरात असतो. वर्षातून एकदा तो मुळ गावी राजस्थाला (Rajasthan) जात असे. घरातील सदस्याप्रमाणे तो रहात असे. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास बसला होता. (Pune Crime)

मुकेश याने ९ सप्टेबर रोजी रात्री गावाकडे पत्नीची तब्येत खूप खराब आहे. मी गावाला जाऊन येतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी ११ सप्टेबर रोजी बेडरुममधील तिजोरीत ठेवलेले ३० लाख रुपये काढले. तेव्हा त्यात केवळ ८ लाख रुपये होते. २२ लाख रुपये मिळून आले नाही. त्यांनी सर्वांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी पैसे घेतले नसल्याचे सांगितले. अचानक सुट्टीवर गेलेल्या मुकेश याच्याकडे त्यांनी कामावर केव्हा येणार अशी चौकशी केली. तेव्हा त्याने राजस्थानला गेला असून १६ सप्टेबरला कामावर येणार असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने फिर्यादी यांनी त्याच्या मित्राला फोन करुन चौकशी केली. तेव्हा त्याने मुकेश राजस्थानला गेला नसून पुण्यात असल्याचे सांगितले. तेव्हा हे पैसे मुकेश यानेच चोरले असल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन शुक्रवारी रात्री मुकेश महाराज याला अटक केली आहे.

Web Title :-  Pune Crime | mukesh mularam Maharaj arrested for stealing 22 lakh rupees after gaining trust swargate police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण

Aurangabad Accident News | शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | लोणीकाळभोरमध्ये कुत्र्याने पळवली कोंबडी, जाब विचारायला गेलेल्या मालकाला जमावाची बेदम मारहाण

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News