Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोडला औरंगाबादहून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांची फसवणुक (Cheating Case) करणार्‍या मुकेश राठोड (Mukesh Rathod) याला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ (Pooja Misal) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली होती. त्यांच्यासह चार महिला आमदारांना फसविण्याचा प्रयत्न मुकेश याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला होता. मुकेश राठोड हा मुळचा बुलढाणा (Buldhana) येथील राहणारा आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबवेवाडी पोलीस (Pune Bibvewadi Police) त्याचा शोध घेत होते. काल त्यांना तो औरंगाबाद येथे सापडला. (Pune Crime)

 

यााबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला.
आपल्या आईला बाणेर (Baner) येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशाची गरज असल्याचे सांगितले.
त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले.
त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे (MLA Meghana Bordikar Sakore),
आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) आणि आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale)
यांच्याकडेही पैशांची मागणी करुन फसवणुकीचा (Fraud Case) प्रयत्न केला होता.
मात्र, या आमदारांना संशय आल्याने त्यांनी त्याला पैसे पाठविले नव्हते.

 

Web Title :- Pune Crime | Mukesh Rathod, who cheated MLA Madhuri Misal, was arrested from Aurangabad pune bibvewadi police crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा