Pune Crime | मुंबई उच्च न्यायालयानं सचिन पोटे, अजय शिंदे, विठ्ठल शेलार यांच्यावरील मोक्क्याच्या तपासाबाबत दिला ‘हा’ महत्वपुर्ण आदेश

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | मुंढवा पोलीस ठाण्यात (mundhwa police station) दाखल असलेल्या गुन्ह्यात (Crime) सचिन पोटे (Sachin Pote) आणि इतरांवर मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या गुन्ह्याचा पुढील तपासाला ‘स्टे’ दिला आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस (Pune Police) त्यांचे म्हणणे मांडणार आहे. 9 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. Pune Crime | Mumbai High Court give stay order of Mocca probe against Sachin Pot, Ajay Shinde, Vitthal Shelar to pune police
टोळीप्रमुख सचिन निवृत्ती पोटे (वय ४०), दगडू भीमराव वैद्य (वय ३६, दोघे रा. जोशी वाडा, नवी पेठ,
पूना हॉस्पिटलसमोर), अजय अनिल शिंदे (वय ३६,रा. हंसा कॉटेज हाऊस, कल्याणीनगर, येरवडा),
विठ्ठल महादेव शेलार (वय ३८,रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे), अजिंक्य राजाराम पायगुडे (वय २८,रा. मानाजीनगर, नºहे, मूळ रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे), अनुप अशोक कांबळे
(वय ३६, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा), अतिक इस्माइल शेख (वय ३३, रा. वडगाव शेरी),
हेमंत मारूती कानगुडे (वय ३५, रा. खिलारेवाडी, एरंडवणे), अंकुश धारू निवेकर (वय २६, रा. भीमनगर, पौड फाटा), अमोल सतीश चव्हाण (वय ३१, रा. बुधवार पेठ, बेलबाग चौक) यांच्यावर हा मोक्का
लावलेला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (mundhwa police station) गुन्हा दाखल आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंढव्यातील टिकी लाऊंज पबमध्ये (WaiKiKi Tiki Bar Pune) दाम्पत्य वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोटे व काहीजणांमध्ये वाद झाले होते.
या वादातून सचिन पोटेने (Sachin Pote) पिस्तुलातून गोळीबार केला.
मात्र, दहशतीमुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती.
त्यानंतर ऑनलाइन बेटींग (online betting) प्रकरणात एकाकडून खंडणी वसूल (extortion) प्रकरणात पोटेविरोधात गुन्हा दाखल झाला.
–
हे प्रकरण समोर आल्यानंतर तपासात पोटेने दोन वर्षांपूर्वी गोळीबार (Firing) केल्याचे उघड झाले.
त्यानुसार त्याची माहिती काढत पोलिसांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police)
गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale) , उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांनी पोटे टोळीवर मोक्का कारवाई केली.
पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (Senior Police Inspector Rajnish Nirmal)
या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
दरम्यान मोक्का कारवाई केल्यानंतर सचिन पोटे अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.
त्यानंतर आता मोक्काचा तपास सुरू होता.
मात्र मुबंई उच्च न्यायालयात या मोक्काबाबत याचिका दाखल केली होती.
त्यावर न्यायालयाने मोक्काचा तपासाला पुढील तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे.
पोलिसांकडून आता याबाबत म्हणणे सादर केले जाणार आहे.
9 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
असे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांनी सांगितले आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत चौघांना अटक केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title : Pune Crime | Mumbai High Court give stay order of Mocca probe against Sachin Pot, Ajay Shinde, Vitthal Shelar to pune police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Madha Police | माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून 4 आरोपींचे पलायन