Pune Crime | पुण्यात मुंढवा पोलिसांकडून गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक, अग्नीशस्त्रे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना मुंढवा पोलिसांच्या (Mundhwa Police Station) तपास पथकानं अटक (Pune Crime) केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रूपयाचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती मुंढवा (Mundhwa News) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी दिली आहे.

 

सागर अविनाश कोद्रे (36, रा. सर्व्हे नं. 54, प्रगती गार्डन, बघे वस्ती, मुंढवा) आणि मंगेश बाळासाहेब तांबे (28, रा. खराडकर पार्क, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक एस.के. पोटे, पोलिस अंमलदार भरत उकिर्डे, नाना भांदुर्गे, दिपक कांबळे, दत्ता जाधव, सचिन पाटील हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार नाना भांदुर्गे यांना आरोपींबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आरोपी हे गायराण वस्ती, ओम साई चौक येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने पोलिस पथकानं वरिष्ठांना माहिती देवून परिसरात साध्या वेशात सापळा रचला. आरोपी परिसरात आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 25 हजार 400 रूपयाची अग्नीशस्त्रे आढळून आली. पोलिसांनी दोघांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Crime) करून त्यांना अटक केली.

सदरील कामगिरी ही अप्पर आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
उपायुक्त (झोन-5) नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक एस.के. पोटे, पोलिस अंमलदार नाना भांदुर्गे, भरत उर्किडे,
दत्ताराम जाधव, दिपक कांबळे, सचिन पाटील, महेश पाठक, माऊली गिरमकर, निलेश पालवे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Mundhwa police arrested two persons carrying village pistols and live cartridges, firearms seized in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PDCC Election | अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी आ. रमेश थोरात यांची सलग आठव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड

Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

Urfi Javed Latest Bold Photo | उर्फी जावेदच्या विचित्र कपड्यांवर नेटकरी झाला फिदा.. चक्क लग्नासाठी घातली मागणी