Pune Crime | गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक, गावठी कट्ट्यासह 2 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढवा परिसरात दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) मुंढवा पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी ही कारवाई मुंढवा चौकाकडून मगरपट्टा कडे जाणाऱ्या ब्रीज खाली मंगळवारी (दि.1) केली. अविनाश सुनिल जगताप Avinash Sunil Jagtap (वय -29 रा. चव्हाण चाळ, मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या सराईताचे (Pune Crime) नाव आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यातील (Mundhwa Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मुंढवा चौकातील मुख्य रस्त्याच्या ब्रीज खाली सराईत गुन्हेगार अविनाश जगताप गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ब्रीज खाली सापळा रचून जगताप याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 17 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे मिळाली. आरोपी जगताप हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) दोन गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण
(Addl CP Namdev Chavan) , पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे
(Senior Police Inspector Ajit Lakde), पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे
(Police Inspector Pradeep Kakade) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे
(API Sandeep Jore), प्रशांत माने (API Prashant Mane) पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे,
राजू कदम, महेश पाठक, राहुल मोरे, सचिन पाटील यांनी केली.

Web Title :-  Pune Crime | Mundhwa Police arrests a criminal carrying a gavathi katta, seizes gavathi katta and 2 cartridges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर

IND Vs BAN Weather Report | एडिलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश मॅच होणार? कसं असेल आजचे हवामान