Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. मुंढवा पोलिसांची एकाच महिन्यातील ही दुसरी कारवाई (Pune Crime) असून आतापर्यंत 3 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निलेश भाऊराव काळे (वय-25 रा. कात्रज, पुणे, मुळ रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक बुधवारी (दि.22) हद्दीत पेट्रोलींग करत असताना निलेश काळे गावठी कट्टा विक्रीसाठी घरपडी येथील जहांगीर चौक ते आंबेडकर चौक दरम्यान येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली. अधिक चौकशीत त्याच्याकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. (Pune Crime)

आरोपीविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे करीत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी मुंढवा पोलिसांनी अविनाश सुनिल जगताप (वय-29 रा. मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त (पुर्व)
नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे,
सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राजु कदम,
महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Mundhwa Police Arrests Criminal Carrying Unlicensed Pistol, 2 Pistols Seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पुनावालांना 1 कोटीचा गंडा ! पुणे पोलिसांची धडक कारवाई; वेगवेगळ्या राज्यातून 7 जणांना अटक, आरोपींमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियरचा समावेश

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार