Pune Crime | खून करुन भासवली आत्महत्या, आरोपी गजाआड; कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अज्ञात कारणावरुन तरुणाचा खून (Murder) करुन मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकवून आत्महत्या (Suicide) असल्याचे भासवण्यात आले. हा प्रकार (Pune Crime) पुण्यातील कोथरुड येथील लोकमान्य कॉलनीत मंगळवारी (दि.20) पहाटे चार ते बुधवारी (दि.21) सकाळी साडे आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

परेश शंकर कंधारे (वय 28 रा. स्मिता हाईट्स, लोकमान्य कॉलनी, परमहंस नगर, कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बापु अडसुळ (वय-36 रा. सागर कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वसंत अवसरे याच्यावर आयपीसी 302, 201 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परेश हा फिर्यादी यांचा मामे भाऊ आहे. मंगळवारी आरोपी आणि परेश हे दारु पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यावेळी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. यातून आरोपीने परेश याचा कशाच्यातरी सहाय्याने परेशचा गळा दाबून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आणि आत्महत्या भासवण्यासाठी आरोपीने परेश याचा मृतदेह शालीच्या सहाय्याने घरातील छताच्या पंख्याला लटकवला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस. राठोड (PSI K.S. Rathod) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder and feigned suicide, accused Gajaad; Incidents in Kothrud area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे रेल्वे स्थानकावरुन अपहरण झालेले बाळ 12 दिवसांनी आईच्या कुशीत; दोनजण ताब्यात

Pune Crime | पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला पकडले, 270 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

Dhishkiyaon Movie | अहेमद आणि बायकोने मिळून केला प्रथमेशचा गेम! ‘ढिंशक्याव’ चित्रपटात पाहा त्यांच्या अनोख्या लग्नसोहळ्याची धमाल

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल