Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर पोलीस दलातील एका निलंबित पोलीसावर (Suspended Police) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात 9 जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्वी गुन्ह्यात अटक केल्याने हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, घटनेपूर्वी रस्त्यात आरडा ओरडा करत असलेल्या टोळक्याला हटकले असल्याने हा प्रकार घडला (Pune Crime) आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याला एका मोठया ‘मॅटर’मध्ये काही महिन्यापुर्वी निलंबित करण्यात आलेले आहे.

परमेश्वर तुकाराम सोनके parmeshwar Tukaram Sonke (41, रा. अनुसया निवास, आदर्शनगर पोलिस कॉलनी, दिघी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अनिकेत हेमराज वाणी (21, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), सुरज खिलारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल आघाम, राहुल जाधव आणि इतर अशा एकुण 9 जणांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत वाणी आणि सुरज खिलारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Crime | Murder attack on suspended police parmeshwar sonke in Pune, two in custody and FIR against 9 others

मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर सोनके पुणे पोलीस दलात कर्तव्यास आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. दरम्यान एका प्रकरणात त्यांना व आणखी एकावर कारवाई करत त्यांना पुणे पोलिस दलातून निलंबित केले आहे.

दरम्यान, दिघीत राहण्यास असून, मंगळवारी सायंकाळी मित्राचे घरघुती कार्यक्रम करून निघाले होते.
यावेळी ममता चौकात आल्यानंतर रस्त्याच्यामध्ये उभा राहून काही मुलं गोंधळ घालत होते. यावेळी
त्यांनी या मुलांना समजावून सांगितले व परत कारमधून निघाले. दिघी जकात नाक्यावर आल्यानंतर
मात्र अनिकेत व त्याच्या 8 साथीदारांनी दगडफेक करत दगडाने मारहाण केली. तर यापूर्वी एका
गुन्ह्यात अनिकेतला पकडले होते. याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीचा पाठलाग करत गाडीवर
दगड मारले व तोडफोड केली. तर ड्रायव्हरच्या बाजूने येत दगफेक करत तुला संपवून टाकतो म्हणत
शिवीगाळ केली. त्यानंतर दुचाकीवर हे टोळके दहशत माजवत पसार झाले आहे, असे या तक्रारीत
म्हंटले आहे. याप्रकरणी दिघी पोलीस (dighi police) तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Viral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Murder attack on suspended police parmeshwar sonke in Pune, two in custody and FIR against 9 others

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update