Pune Crime | पुण्यातील नऱ्हे येथील व्यसनमुक्ती केंद्रात एकाचा काचेने गळा कापून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील नऱ्हे (Narhe) येथील व्यसनमुक्ती केंद्रात (Addiction Centre Pune) दारु सोडवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा त्याच्या सहकाऱ्याने निर्घृण खून (Murder In Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आरोपीने त्याच्या सहकार्याचा काचेने गळा कापून खून (Pune Crime) केला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी (Pune Police) आरोपी संकेत सुनील अल्हाट Sanket Sunil Alhat (वय – 24) याला ताब्यात घेतले आहे. तर अरुण मोहन राठी Arun Mohan Rathi (वय – 65) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत 53 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यसनमुक्ती केंद्र नऱ्हे येथील एका निवासी इमारतीत आहे.
याठिकाणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 45 व्यक्ती उपचार (Treatment) घेत आहेत.
यातील एका खोलीत 12 जण उपचार घेत होते. 16 एप्रिल रोजी आरोपी संकेत याचा वाढदिवस होता.
वाढदिवसादिवशी घरचे कोणीच भेटायला आले नसल्याने तो तणावात होता. त्यातच मयत राठी हे त्याला शिवीगाळ करत होते. याचा राग मनात धरुन गुरुवारी पहाटे आरोपी आल्हाट साडेतीनच्या सुमारास त्याच्या जागेवरून उठला आणि राठी झोपलेल्या ठिकाणी गेला. त्याने राठी याच्या तोंडावर टॉवेल टाकून काचेच्या तुकड्याने त्याचा गळा चिरला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने जखमेमध्ये बोट घालून गळा फाडण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

राठी जिवाच्या आकांताने ओरडत असताना खोलीमधील इतरांना जाग आली.
मात्र आल्हाट याचा रुद्रावतार पाहून इतर कोणीच मध्ये पडले नाही.
राठी याचा मृत्यू (Death) झाल्यानंतर आल्हाट त्याच्या जागेवर जाऊन झोपला. राठी फेब्रुवारी महिन्यात तर आरोपी आल्हाट ऑगस्ट महिन्यात दारु सोडवण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्रात दाखल झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे (API Prashant Kanase) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- pune crime murder by cutting the throat of a man at a de addiction center at narhe in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा