Pune Crime | धक्कादायक ! पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजवर नेऊन प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे – सातारा रस्त्यावरील (Pune Satara Road) शितल लॉजमधील (Sheetal Lodge) एका रूमच्या बाथरूममध्ये (Dead Body In Bathroom) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला 24 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे (Murder In Pune). ही तरूणी रात्री तिच्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती. आज सकाळी सफाई कामगार सफाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या तरूणीचे नाव दिप्ती काटमोडे आहे. तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे लॉजचा कामगार रूमची साफ – सफाई करत असताना त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हा प्रकार ताबडतोब पोलीसांना कळविण्यात आला. (Pune Crime)

 

भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police) घटनास्थळी पोहचल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर कुणीतरी गळा चिरून तरूणीचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
दिप्ती काटमोडे ही तिच्या मित्रासोबत रात्री लॉजवर आली होती.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पसार झालेल्या तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | murder by slitting the throat of the beloved to the lodge shocking incident pune satara road sheetal lodge pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा