Pune Crime | पुण्यातील वारजेमध्ये तरुणाच्या डोक्यात वार करुन खून, दुसरा गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकाच रुममध्ये राहणार्‍या एकाने आपल्या दोन सहकार्‍यांवर कठीण वस्तूने डोक्यात वार केले. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वारजे (Warje Malwadi) येथील न्यू अहिरे गावात बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास (Pune Crime) घडली.

 

रामपूजन महेंद्रर शर्मा (वय २२, रा. मुळगाव शंकरपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रामभरोस शर्मा (वय २१) हा जखमी झाला आहे. याबाबतची माहिती अशी, रामपूजन हा सुतारी काम करीत असत. हे तिघेही मुळचे बिहारचे राहणारे असून गेल्या काही काळापासून गणपती माथा येथील रुममध्ये एकत्र राहत होते. त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला.

 

त्यानंतर हरिकुमार शर्मा याने रामपूजन व रामभरोस यांच्या डोक्यात कठीण वस्तूने घाव (Pune Crime) घातले.
त्यात रामपूजन याचा मृत्यु झाला. रामभरोस याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे (police inspector amrut marathe) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder by stabbing a young man in the head in Warje Malwadi, Pune, another seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा