Pune Crime | पुण्यात एकट्या राहणार्‍या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोलमजुरी करुन एकटा राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या वृद्ध महिलेच्या घरात शिरुन तिचा गळा आवळून खून (Murder In Pune) केला. त्यानंतर तिच्या अंगावरील व घरातील दागिने (Gold Jewelry) चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पारुबाई किसन सावंत Parubai Kisan Sawant (वय ६५, रा. मेनका स्टोन कंपनीजवळ, भिलारवाडी, कात्रज – Katraj) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी तिचा भाऊ शहाजी मारुती चंदनशिवे Shahaji Maruti Chandanshive (वय ६०, रा. भिलारवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) (४६२/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुखा बिंदा Sukha Binda (रा. मेनका स्टोन कंपनीजवळ, भिलारवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदनशिवे व पारुबाई सावंत हे भाऊ बहीण आहेत. दोघेही शेजारीशेजारी रहातात. पारुबाई या मोलमजुरी करुन एकट्याच रहात होत्या. सुखा बिंदा हा तेथेच सुरक्षारक्षक (Security Guard) म्हणून काम करीत होता. पारुबाई एकटी रहात असल्याचे पाहून त्याने तिचा गळा आवळून खून केला. तिचे गळ्यातील सोन्याच्या वस्तू व कानातील कर्णफुले, पत्र्याच्या पेटीतील रोख रक्कम व दागिने चोरुन नेले. जाताना त्याने घराला बाहेरुन कुलूप लावून तो निघून गेला होता. पारुबाई अशी कोणाला न सांगता कशी गेली, याचा शहाजी चंदनशिवे यांना संशय आला. त्यांनी घर उघडून पाहिले असता आत पारुबाई मृतावस्थेत आढळून आल्या. ही घटना घडल्याचे समजल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
शवविच्छेदनात तिचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
तेथेच राहणारा सुखा बिंदा हा त्याच रात्री पत्नीला घेऊन पळून गेल्याचे लक्षात आले.
तो कोणाचा फोनही घेत नसल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावळा असून
पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder by strangling an elderly woman living alone in katraj pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा