Pune Crime | पुण्यात अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 3 महिन्याच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव; 13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने आईनं केलं ‘हे’ कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) केल्याची तक्रार आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयत मुलीच्या आईकडे केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईनेच मुलीचा गळा दाबून खून (Murder) केला. त्यानंतर 13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन (Bundgarden Bridge) नदीत फेकल्याची माहिती आईकडे केलेल्या चौकशीतून (Pune Crime) समोर आली. तसेच ही मुलगी अनैतिक संबंधातून (immoral relationship) जन्मल्याचे समोर आले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे तर 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील असून मागील काही महिन्यांपासून ती पुण्यात (Pune Crime) भावाकडे रहायला आहे. तिचा घटस्फोट (Divorce) झाला असून तिला 13 वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. शुक्रवारी सायंकाळी तिने मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलाच्या मदतीने मुलीचा मृतदेह गोणीत भरून नदीत फेकून दिला. यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करु तपास सुरु केला.

 

पोलिसांनी महिलेकडे आणि मुलाकडे चौकशी केली असता दोघांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलगी सतत रडत होती. रात्र रात्र जागवत होती. अनैतिक संबंधातून तिचा जन्म झाला होता. मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे म्हणून आपणच तिचे तोंड दाबून खून केला. मुलाच्या मदतीने मृतदेह नदीत फेकल्याची माहिती महिलेने (Pune Crime) दिली. पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. या गुन्ह्यात आईला अटक (Arrest) केली आहे तर मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav) यांनी दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक आयुक्त किशोर जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Shaikh),
पोलीस निरीक्षक विजयसिहं चौहान (Police Inspector Vijay Singh Chauhan)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर (API Ravindra Alekar),
उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे (PSI Ravindra Kumar Warangule), किरण लिट्टे,
पोलीस अंमलदार तेजस भोसले, सिद्धाराम पाटील, अमजद शेख, शुभांगी चव्हाण, विष्णू ठाकरे, अनिल शिंदे यांनी हा तपास केला.

 

Web Title :- Pune Crime | murder case of 3 month child mother and 13 years old son yerwada police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan arrest case | ‘समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे…’, वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपानंतर भाजपची सावध भूमिका

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुणे पोलिसांकडून वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणात दोघांना अटक (व्हिडीओ)