×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून,...

Pune Crime | हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून (Dispute) एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) हडपसर परिसरात (Hadapsar Area) घडली आहे. ही घटना रविवारी (दि.3) संध्याकाळी 7.20 च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) खूनाचा गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) केली आहे.

 

युवराज बाबुराव जाधव Yuvraj Baburao Jadhav (वय-34 रा. धनराज डेअरी, पापडे वस्ती, फुरसुंगी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी गणेश सुरेश खरात Ganesh Suresh Kharat (वय-35 रा. श्रीनाथ कॉलनी, पापडे वस्ती, फुरसुंगी Fursungi) याला अटक केली आहे. याबाबत मृत युवराज याचे वडिल बाबुराव माणिक जाधव (वय-55) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचा दुग्ध व्यवसाय (Dairy Business) असून पापडे वस्ती परिसरात त्यांची डेअरी आहे. युवराजने आरोपी गणेश याला हातउसने पैसे (Money) दिले होते. आरोपी चालक म्हणून काम करत असून युवराज दिलेल्या पैशांची मागणी करत होता. युवराज सतत पैशांची मागणी करत असल्याने आरोपीच्या मनात त्याच्याविषयी राग होता.

रविवारी मृत युवराज हे घरासमोर बुलेटवर बसले होते. आरोपी गणेश त्याठिकाणी आला.
युवराज आणि यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर आरोपी गणेशने पाठीमागून येऊन धारदार लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यात,
तोंडावर, मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार केले.
यात गंभीर जखमी होऊन युवराज याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गणेश खरात याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात (API Sachin Thorat) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder in hadapsar area on money dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

 

Pune Crime | लग्नानंतर अचानक भेटली प्रेयसी अन् बहरलं जुनं प्रेम ! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर घडलं असं काही की इंजिनियर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल…

 

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News