Pune Crime | दारु पिताना झालेल्या वादातुन चुलत भावाचा खून, लोणी काळभोरच्या हद्दीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दोघेही चुलत भाऊ एकत्र दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका पेटला की एकाने दुसर्‍याच्या चेहर्‍यावर वार करुन त्याचा खून (Murder in Pune) केला. हा प्रकार हवेली तालुक्यातील रायगाव पेठ येथील म्हसोबा मंदिरासमोर शुक्रवारी सायंकाळी घडला. (Pune Crime)

 

सुभाष चौधरी (वय ५५, रा. वडाची वाडी, नायगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सौरभ सुभाष चौधरी (वय २३, रा. वडाची वाडी, नायगाव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संपत तुकाराम चौधरी (वय ४६, रा. वडाची वाडी पेठगाव) याला अटक केली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष चौधरी आणि संपत चौधरी हे चुलत भाऊ आहेत. ते म्हसोबा मंदिरासमोरील मार्ग वस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी दारु पिण्यास बसले होते. कोणत्या तरी कारणावरुन त्यांच्यात वादावादी सुरु झाली. एकमेकांना शिवीगाळ केल्याचे कारणावरुन संपत याने सुभाष याच्या चेहर्‍यावर धारधार शस्त्राने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता पहाटे त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन संपत चौधरी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder In Loni Kalbhor Police Station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा