Pune Crime | लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तरुणाचा खून; मांजरीमधील महादेवनगर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लाकडी दांडा व प्लॅस्टिक पाईपने डोक्यात मारहाण करुन एका तरुणाचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime)

 

सागर गिरीधर दासमे (वय २७, रा. महादेवनगर, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मांजरीमधील महादेवनगर (Mahadev Nagar Manjri) येथील गणेश निवास येथे ५ जून रोजी दुपारी २ ते ६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.

 

याबाबत सागर याचा भाऊ लखन गिरीधर दासमे (वय २६, रा. बोरकर वस्ती, लोणी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६६०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गौरव कारकिले, राजू सोनवणे (रा. महादेवनगर, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर दासमे हा पेटिंगचे काम करत होता. गौरव व राजू हेही पेटिंगचे काम करतात. महादेवनगरमध्येच सागर रहात होता. गौरव कारकिले याच्या घरी त्याचे येणे जाणे होते. सागर रविवारी दुपारी गौरव रहात असलेल्या गणेश निवास येथे गेला होता. गौरव येथे गेल्या दीड वर्षापासून राहत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचे घराचे दार नुसते लोटलेले दिसून आले.

तेव्हा घरमालकीणने आत जाऊन पाहिले असता तेथे सागर दासमे हा पडलेला आढळून आला.
त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
घरात राहणारा गौरव व राजू हे दोघेही पसार झाल्याचे आढळून आले.
सागर याच्या डोक्यात लाकडी दांडा व प्लॅस्टिक पाईपने मारहाण करुन त्याचा खून केल्याचे दिसून आले आहे.
घरातील दोघे जण पसार झाले असल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
दोघांना पकडल्यानंतरच नेमका काय प्रकार घडला याची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder In Mahadev Nagar Manjri Hadapsar Police Station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

 

Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर