Pune Crime | खडकीत तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खुन

पुणे : Pune Crime | खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station) समोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.

रमजान सय्यद (वय ३५) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल शेलार यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे.

खडकी रेल्वे स्टेशन समोर एक जण पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी कळविली. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर एका तरुणाच्या डोक्यात तसेच उजव्या व डाव्या डोळ्यावर  तसेच शरीरावर विविध ठिकाणी घातक शस्त्राने वार करुन खुन करण्यात आल्याचे आढळून आले. त्याचे नाव रमजान सय्यद (वय ३५) असल्याचे समजले. मात्र, तो कोठे राहतो, याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Crime News | गुंडाचा त्याच्याच मित्राने केला घरात घुसून खुन; कारण समजल्यावर पोलीसही झाले ‘अचंबित’

Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

Pune Crime | भंगार विक्रेत्यांमध्ये राडा ! जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | murder near khadki railway station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update