Pune Crime | प्रेमसंबंधांमधून जन्मलेल्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या ! मुंढवा पोलिसांचं साडेतीन तास सर्च ऑपरेशन, महत्वाचे पुरावे हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  प्रेमसंबंधांमधून जन्मलेल्या 13 दिवसांच्या बाळाला आश्रमात ठेवण्याचे आश्वासन देऊन त्याची जंगलात नेऊन विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. 2019 साली घडलेल्या घटनेप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) मुंढवा पोलिसांनी (Mundhwa police) गुन्हा (FIR) दाखल केला असून दोघाजणांना अटक (Arrest) केली आहे. शुभम महेश भांडे Shubham Mahesh Bhande (वय 23, रा. वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे Yogesh Suresh Kale (वय 26, रा. मांजरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Inspector Brahmananda Naikwadi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम आणि पीडित महिला एकाच खासगी कंपनीत नोकरीस आहेत.
तेथे त्यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहू लागले.
या प्रेम संबंधांमधून दोघांना 14 मार्च 2019 रोजी मुलगा (baby born) झाला.
दोघांचेही लग्न झालेले नसल्याने या मुलाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळे या बाळाला अनाथ आश्रमात (Anath Ashram) ठेवण्याचे आश्वासन शुभम याने दिले.
हे बाळ 13 दिवसाचे असतानाच आरोपीने आश्रमात नेऊन सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेले.
त्याचा साथीदार असलेल्या योगेश काळे याच्या मदतीने हे बाळ लोहगाव विमानतळाजवळील जंगलात (forest near Lohgaon Airport) नेऊन सोडले.
तिथं त्याचं बरंवाईट केलं. दरम्यान, मुंढवा पोलिसांच्या 3 अधिकारी आणि 15 कर्मचार्‍यांनी आज सर्च ऑपरेशन राबवलं आणि महत्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.

मागील, तीन वर्षांपासून आरोपी शुभम या तरुणीला बाळ सुरक्षित असल्याचे सांगत होता.
तिने बाळाला वारंवार भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र, त्याने काही तरी कारणे देत वेळ मारून नेली.
मागील काही दिवसांपासून या तरुणीला त्याबद्दल शंका येऊ लागली होती.
आपल्या बाळाची भेट घडवून आणली जात नसल्याने तसेच आश्रमाचे नावही माहिती नसल्याने आपल्या बाळाचे काही तरी बरे वाईट झाले असण्याची शंका त्यांना आली.
याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली.

 

मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोहगाव विमानतळजवळील जंगलात शोध घेतला असता बाळाच्या डोक्याची टोपी (कुंची) पोलिसांना आढळून आली आहे.
तसेच एक प्रत्यक्षदर्शी मिळून आला आहे.
पोलिसांना मिळालेली बाळाची कुंची लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी कुटे (PSI Shivaji Kute) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder of 13-day-old baby born out of love affair! Mundhwa police conducted a three and a half hour search operation and seized important evidence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pensioner ला Life Certificate देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, ‘या’ केंद्रांवर करू शकतात जमा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 217 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी