Pune Crime | पुण्यातील हडपसरमध्ये 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, फुरसुंगीच्या गंगानगर परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्याच्या हडपसर (Hadapsar) जवळील फुरसुंगी परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून एका लॉन्ड्री चालकाचा कोयत्याने सपासप वार करुन खून (Murder in Pune) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) फुरसुंगी (Fursungi) परिसरातील गंगानगर मधील माऊली कॉलनीमध्ये (Mauli Colony, Ganganagar) आज (सोमवार) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

गणेश शशिकांत महापुरे Ganesh Shashikant Mahapure (वय-23 रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे खून झालेल्या लॉन्ड्री व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत सिद्धेश्वर शशिकांत महापुरे Siddheshwar Shashikant Mahapure (वय-27 रा गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश महापुरे याचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले होते. मात्र त्याला व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी राहत्या घरासमोर लॉन्ड्रीचे सात महिन्यापूर्वी दुकान सुरु करुन दिले होते. आज सायंकाळी आरोपींनी त्याला दुकानांमधून बाहेर ओढत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला. भर बाजारात घडलेल्या या घटनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे (Police Inspector  Digambar Shinde) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder of 23-year-old young boy in ganga nagar fursungi of Hadapsar in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Online Ration Card | रेशन कार्डसंबंधी आता ‘या’ सुविधा मिळणार ऑनलाइन, कशी आहे पद्धत?

 

PF New Rules | नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF च्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल, जाणून घ्या सविस्तर

 

Tax Planning | इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 7 पद्धती, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ उपाय