Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गालगत 26 वर्षीय तृतीयपंथीयाचा निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यात बोरीभडक (boribhadak) येथे एका तृतीयपंथीयाचा खून (Murder of Transgender) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत (Pune-Solapur Highway) असलेल्या गायरानात तृतीयपंथीयांचा मृतदेह (Pune Crime) आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station) अधिकारी घेत आहे.

 

26 वर्षीय बंटी असे खून (Pune Crime) झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव सांगितले जात आहे. मागील दोन दिवसांपूर्वी खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महामार्गालगत असलेल्या झाडी लगत रात्रीच्या वेळी अनेक तृतीयपंथी थांबलेले असतात. यावेळी तेथे दुचाकी व चारचाकी गाड्या थांबून नेमका काय प्रकार सुरु असतो? असा संशय अनेकांना आहे.

 

या झाडीत गैरप्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु या ठिकाणी लोकवस्ती दूर असल्याने याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. मात्र आता या ठिकाणी तृतीयपंथीयाचा खून (brutal murder of Transgender) झाल्याने हे ठिकाण चर्चेचा विषय बनले आहे. पोलीस तपासात अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of 26-year-old transgender bunty near Pune-Solapur highway boribhadak daund taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sankarshan Karhade | झी मराठीवर लवकरच होणार नव्या ‘शो’ची एन्ट्री; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत

Madhavi Gogate | ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं 58 व्या वर्षी मुंबईत निधन

IND Vs NZ Test Series | न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूनं दिला इशारा; म्हणाला – ‘अश्विन-अक्षरसाठी प्लॅन रेडी