Pune Crime | पुण्यात 70 वर्षाच्या महिलेचा खून; सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथील घटना

पुणे : Pune Crime | सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथे एकट्या राहणार्‍या 70 वर्षाच्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Murder on Sinhagad Road) आहे. घरातील १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आले आहेत. शालिनी बबन सोनावणे (वय ७०, रा. सायली अपार्टमेंट, केदारीनगरी, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव (Pune Crime) आहे.

याप्रकरणी त्यांचा मुलगा विराट बबन सोनवणे (वय ३९) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री १० वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी सोनवणे या एकट्याच रहात होत्या.
त्यांचा मुलगा हा जवळच्या इमारतीत राहतो.
काल रात्री तो आईच्या घरी गेल्यावर त्यांना आई हॉलमध्ये पडली असल्याचे दिसून आले.
त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला (Control Room) कळविले.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले.
शालिनी यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केला (Pune Crime) असावा, असा संशय आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला (Sasoon Hospital) पाठविला आहे.
शालिनी यांचा खून करुन चोरट्याने १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत.
शालिनी या घरात एकट्याच होत्या. त्यामुळे कोणी तरी ओळखीची व्यक्ती आल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असावा, त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्रथमदर्शनी संशय (Pune Crime) आहे.

हे देखील वाचा

सावधान ! जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या ‘ही’ मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | murder of 70 years old woman on sinhagad road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update